

सदगुरु श्री श्रीराम महाराजांनी वसवलेला "समर्थ कुटी" हा आश्रम अत्यंत रमणीय व रामनामाने रंगलेला आहे. मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील बडवाह गावाजवळ नावघाटखेडी येथे नर्मदेच्या उत्तरतीरावर आश्रम वसलेला आहे. ज्या ठिकाणी श्री आनंदसागर महाराजांनी (श्री गोंदवलेकर महाराजांचे परमशिष्य) "श्रीराम जय राम जय जय राम" ह्या मंत्राचे साडेतीन कोटी जपानुष्ठान केले होते, तिथेच हा आश्रम स्थापण्यात आला आहे हे विशेष !
आश्रमाचा परिसर अत्यंत रम्य असून, येथे श्रीरामाचे, श्री ब्रम्हचैतन्य महाराजांचे, श्री ब्रम्हचैतन्येश्वर महादेवाचे, मारुतीरायाचे व सदगुरुंच्या पादुकांचे अशी मंदिरे आहेत व ह्याच वर्षी नर्मदा जयंतीला श्री नर्मदा मातेच्या अत्यंत सुंदर अशा मुर्तीचीही प्रतिष्ठापना स्वत: श्रींच्या हस्ते करण्यात आलेली आहे।भक्तांसाठी जपकक्ष बांधण्यत आला असून येथे रोज तेरा तास व उत्सवाच्या / पर्वणीच्या काळात चोवीस तास अखंड जप सुरु असतो.
kalyanswami.blogspot.in
ReplyDelete